भारतातील सर्वोत्तम जीवनसत्त्व बी१२ पूरक औषधे: फायदे, कमतरता आणि उत्तम गोळ्यांची संपूर्ण माहिती
तुम्हालाही सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे आणि स्मरणशक्ती कमी होणे यांसारखे त्रास होत आहेत का? ही शरीरातील जीवनसत्त्व बी१२ची कमतरता असल्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळीच लक्ष न दिल्यास रक्तक्षय आणि मज्जातंतूंना इजा होण्यासारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात.
आपले शरीर स्वतःहून जीवनसत्त्व बी१२ तयार करू शकत नाही. मज्जासंस्थेचे योग्य कार्य, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि शरीरातील जनुकीय घटक तयार होण्यासाठी हे जीवनसत्त्व प्राणिजन्य पदार्थ किंवा पूरक गोळ्यांमधून मिळवावे लागते.
यावरून आपल्या शरीरासाठी जीवनसत्त्व बी१२ किती महत्त्वाचे आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल. अनेक लोकांना आहारातूनही शरीराला आवश्यक असलेले पुरेसे जीवनसत्त्व बी१२ मिळत नाही. अशा वेळी या जीवनसत्त्वाच्या पूरक गोळ्या घेणे महत्त्वाचे ठरते.
माय१२ ओडी, माय१२ ५०० आणि झेकोबॅक्स फोर्ट ही भारतात उपलब्ध असलेली जीवनसत्त्व बी१२ची काही उपयुक्त पूरक औषधे आहेत. चला, त्यांचे महत्त्व आणि उपयोग अधिक जाणून घेऊया.
जीवनसत्त्व बी१२ (कोबालामिन) म्हणजे काय?
जीवनसत्त्व बी१२ (कोबालामिन) हे पाण्यात विरघळणारे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. लाल रक्तपेशी तयार करणे, शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करणे आणि मज्जासंस्था निरोगी ठेवणे अशा अनेक कामांसाठी शरीराला याची गरज असते.
आपले शरीर हे जीवनसत्त्व स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ते अन्नपदार्थ किंवा पूरक औषधांमधून मिळवावे लागते.
शरीरासाठी जीवनसत्त्व बी१२चे महत्त्व
शरीरातील अनेक महत्त्वाची कामे सुरळीत पार पडण्यासाठी जीवनसत्त्व बी१२ आवश्यक असते. त्याचे काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
- लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते आणि रक्तक्षयाचा धोका कमी करण्यास उपयोगी ठरते.
- मज्जातंतूंभोवती संरक्षणात्मक आवरण तयार करण्यास मदत करते आणि त्यांचे कार्य सुरळीत ठेवते.
- मेंदू आणि मज्जासंस्थेचे कार्य तसेच विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता चांगली राखण्यास मदत करते.
- शरीरातील जनुकीय घटक तयार होण्यास मदत करते.
- अन्नातील पोषक घटकांचा योग्य वापर करून शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करते.
शरीरात जीवनसत्त्व बी१२ची कमतरता असल्याची लक्षणे कोणती?
शरीरात जीवनसत्त्व बी१२ची कमतरता हळूहळू वाढत जाते. त्यामुळे शारीरिक, मज्जासंस्थेशी संबंधित तसेच मानसिक स्वरूपाचे त्रास जाणवू शकतात. वेळीच उपचार न केल्यास ही लक्षणे कालांतराने अधिक गंभीर होऊ शकतात.
- अशक्तपणा आणि सतत थकवा जाणवणे
- त्वचा फिकट किंवा पिवळसर दिसणे
- हातापायांना बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे
- चालताना किंवा शरीराचा तोल सांभाळताना अडचण येणे
- स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
- मनःस्थितीत बदल होणे किंवा नैराश्य जाणवणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- जिभेला सूज येणे किंवा जीभ दुखणे
- भूक मंदावणे
- डोकेदुखी होणे
कोणाला जीवनसत्त्व बी१२च्या पूरक गोळ्यांची गरज असते?
ज्या लोकांना जीवनसत्त्व बी१२ची कमतरता होण्याचा धोका अधिक असतो, त्यांना या जीवनसत्त्वाच्या पूरक गोळ्यांची गरज भासू शकते. विशेषतः शाकाहारी किंवा पूर्णपणे वनस्पतीजन्य आहार घेणाऱ्या व्यक्तींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खालील व्यक्तींना जीवनसत्त्व बी१२ची पूरक औषधे घेण्याची गरज भासू शकते:
- शाकाहारी किंवा पूर्णपणे वनस्पतीजन्य आहार घेणाऱ्या व्यक्ती
- ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती
- मेटफॉर्मिन औषध घेणारे मधुमेही रुग्ण
- ज्यांना नेहमी अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो अशा व्यक्ती
- पचनाशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्ती
- दीर्घकाळ मानसिक ताण किंवा कुपोषणाचा त्रास असलेल्या व्यक्ती
- गर्भवती महिला (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
जीवनसत्त्व बी१२च्या पूरक गोळ्यांचे फायदे कोणते?
जीवनसत्त्व बी१२च्या पूरक गोळ्या शरीरातील विविध कामे सुरळीत ठेवण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात घेतल्यास शरीरातील या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासही उपयोगी ठरतात.
चांगल्या दर्जाच्या जीवनसत्त्व बी१२च्या पूरक गोळ्या घेतल्याने पुढील फायदे मिळू शकतात:
- आहारातून पुरेसे जीवनसत्त्व बी१२ मिळत नसल्यास शरीरातील त्याचे प्रमाण पुन्हा योग्य राखण्यास मदत होते.
- मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखण्यास आणि कमतरतेमुळे होणारे मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत होते.
- शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.
- जीवनसत्त्व बी१२च्या कमतरतेमुळे जाणवणारा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत होते.
- मेंदू आणि मज्जासंस्थेचे कार्य चांगले राखण्यास मदत होते.
- पेशींमध्ये जनुकीय घटकांची (डीएनए) निर्मिती आणि देखभाल करण्यास मदत होते.
केस गळतीसाठी या जीवनसत्त्व बी१२च्या पूरक गोळ्यांबद्दलही जाणून घ्या.
जीवनसत्त्व बी१२च्या पूरक औषधांचे प्रकार
जीवनसत्त्व बी१२ची पूरक औषधे वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असतात. प्रत्येक प्रकाराची स्वतःची वैशिष्ट्ये आणि उपयोग आहेत.
यापैकी कोणते औषध घ्यावे, हे व्यक्तीची गरज, शरीरात ते शोषले जाण्याची क्षमता आणि डॉक्टरांचा सल्ला यांवर अवलंबून असते.
|
प्रकार |
माहिती |
|
सायनोकोबालामिन |
हे जीवनसत्त्व बी१२चे कृत्रिम स्वरूप आहे. ते टिकाऊ असल्यामुळे पूरक औषधे आणि जीवनसत्त्वे मिसळलेल्या अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. |
|
मिथाइलकोबालामिन |
हे जीवनसत्त्व बी१२चे सक्रिय स्वरूप असून मज्जातंतूंचे आरोग्य आणि लाल रक्तपेशींची निर्मिती यांसाठी मदत करते. |
|
हायड्रॉक्सोकोबालामिन |
जीवनसत्त्व बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या या जीवनसत्त्वाच्या प्रकाराचा वापर केला जातो. |
|
ॲडेनोसिलकोबालामिन |
हे जीवनसत्त्व बी१२चे सक्रिय स्वरूप आहे. काही पोषक घटकांपासून पेशींना ऊर्जा तयार करण्यास ते मदत करते. |
भारतातील सर्वोत्तम जीवनसत्त्व बी१२च्या गोळ्यांची यादी
जीवनसत्त्व बी१२च्या कमतरतेसाठी सर्वोत्तम गोळी शोधत आहात का? शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास, मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करणारी भारतातील काही उत्तम बी१२ पूरक औषधे येथे दिली आहेत. गुणवत्ता, परिणामकारकता आणि परवडणारी किंमत लक्षात घेऊन त्यांची काळजीपूर्वक निवड केली आहे.
माय१२ ओडी गोळी
माय१२ ओडी ही जीवनसत्त्व बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी उपयुक्त गोळी मानली जाते. यामध्ये १५०० मायक्रोग्रॅम मिथाइलकोबालामिन असते. शरीरातील जीवनसत्त्व बी१२चे प्रमाण योग्य राखण्यासोबतच मज्जातंतूंचे कार्य, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि शरीराचा उत्साह टिकवण्यास ही गोळी मदत करू शकते.
- घटक: मिथाइलकोबालामिन (१५०० मायक्रोग्रॅम)
- फायदे: मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखते, शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत करते, लाल रक्तपेशींची निर्मिती सुधारते आणि थकवा कमी करण्यास उपयोगी ठरते.
माय१२ ५०० गोळी
माय१२ ५०० गोळी हे जीवनसत्त्व बी१२चे पूरक औषध आहे. यामध्ये मेकोबालामिन असते. शरीरातील जीवनसत्त्व बी१२चे योग्य प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखण्यासाठी या गोळीचा वापर केला जातो. विशेषतः ज्या व्यक्तींना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते, त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.
- घटक: मेकोबालामिन (५०० मायक्रोग्रॅम)
- फायदे: मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखण्यास, शरीरातील ऊर्जा टिकवण्यास, लाल रक्तपेशींची निर्मिती सुधारण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करते.
झेकोबॅक्स झेड मल्टिव्हिटॅमिन कॅप्सूल
झेकोबॅक्स झेड कॅप्सूल हे अनेक आवश्यक पोषक घटकांसोबत जीवनसत्त्व बी१२ असलेले पूरक औषध आहे. शरीराची रोजची पोषणाची गरज पूर्ण करण्यास आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास हे कॅप्सूल मदत करू शकते.
- घटक: लायसिन (५० मिग्रॅ) + जीवनसत्त्व बी१ (१.४ मिग्रॅ) + जीवनसत्त्व बी२ (१.६ मिग्रॅ) + जीवनसत्त्व बी६ (२ मिग्रॅ) + जीवनसत्त्व बी१२ (०.००१ मिग्रॅ) + जीवनसत्त्व क (२५ मिग्रॅ) + फॉलिक आम्ल (०.१ मिग्रॅ) + नायसिन (१८ मिग्रॅ) + पॅन्टोथेनिक आम्ल (५ मिग्रॅ) + तांबे (१.७ मिग्रॅ) + सेलेनियम (०.०४ मिग्रॅ) + जस्त (१७ मिग्रॅ)
- फायदे: अन्नातून ऊर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला मदत करते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखते, मज्जातंतूंचे आरोग्य जपते आणि थकवा व अशक्तपणा कमी करण्यास उपयोगी ठरते.
झेकोबॅक्स फोर्ट गोळी
झेकोबॅक्स फोर्ट गोळी हे जीवनसत्त्व बी समूहातील विविध जीवनसत्त्वे असलेले पूरक औषध आहे. शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळवून देण्यासाठी आणि आरोग्याचा समतोल राखण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेष पोषणाची गरज असलेल्या व्यक्तींसाठी हे उपयुक्त ठरू शकते.
- घटक: रायबोफ्लेविन (४.५ मिग्रॅ) + नायसिनामाइड (४५ मिग्रॅ) + थायामिन मोनोनायट्रेट (५ मिग्रॅ) + पायरीडॉक्सिन हायड्रोक्लोराइड (३ मिग्रॅ) + सायनोकोबालामिन (५ मायक्रोग्रॅम)
- फायदे: मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखण्यास, शरीरातील ऊर्जा टिकवण्यास, चयापचयाची प्रक्रिया सुधारण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करते. एकूण आरोग्य चांगले राखण्यासही उपयोगी ठरते.
झेकोबॅक्स सीझेडएस गोळी
झेकोबॅक्स सीझेडएस गोळी हे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पूरक औषध आहे. शरीरातील पोषक घटकांचा समतोल राखण्यास आणि विविध शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास हे मदत करते. विशेष पोषणाची गरज असलेल्या व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो.
- घटक: पायरीडॉक्सिन हायड्रोक्लोराइड (३ मिग्रॅ) + निकोटिनामाइड (१०० मिग्रॅ) + सायनोकोबालामिन (१५ मायक्रोग्रॅम) + फॉलिक आम्ल (१५०० मायक्रोग्रॅम) + क्रोमियम पिकोलिनेट (२५० मायक्रोग्रॅम) + सेलेनियस आम्ल (१०० मायक्रोग्रॅम) + झिंक सल्फेट मोनोहायड्रेट (६१.८ मिग्रॅ)
- फायदे: रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास, आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेला मदत करण्यास, पेशींचे आरोग्य चांगले राखण्यास आणि शरीराचा उत्साह टिकवण्यास उपयोगी ठरते. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासही मदत करते.
सर्वोत्तम जीवनसत्त्व बी१२चे पूरक औषध कसे निवडावे?
जीवनसत्त्व बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य पूरक औषध निवडणे महत्त्वाचे आहे. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी औषधाचा प्रकार, मात्रा, शरीरात ते शोषले जाण्याची क्षमता आणि स्वतःच्या गरजा या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
- औषधातील घटक तपासा: मिथाइलकोबालामिन किंवा सायनोकोबालामिन यांपैकी कोणता घटक आहे आणि प्रत्येक मात्रेमध्ये जीवनसत्त्व बी१२ किती प्रमाणात आहे, हे तपासा.
- कमतरतेचे प्रमाण लक्षात घ्या: रक्ततपासणीचे निष्कर्ष आणि लक्षणे पाहून डॉक्टर तुम्हाला वेगळी मात्रा घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
- योग्य प्रकार निवडा: अनेकांना गोळ्या आणि कॅप्सूल घेणे सोयीचे वाटते. मात्र, गोळ्या गिळण्यास त्रास होत असल्यास द्रवरूप औषध घेणे सोपे ठरू शकते.
- इतर घटक तपासा: काही पूरक औषधांमध्ये फॉलिक आम्ल, जीवनसत्त्व बी६ किंवा इतर पोषक घटक असतात. असे मिश्र औषध योग्य असेल तेव्हाच निवडा.
- औषधाची गुणवत्ता तपासा: उत्पादकाची माहिती, वापरण्याची अंतिम तारीख, साठवणुकीच्या सूचना आणि लागू असलेली गुणवत्ता प्रमाणपत्रे तपासा.
- शरीरात शोषले जाण्याची क्षमता लक्षात घ्या: शरीराला जीवनसत्त्व बी१२ शोषून घेण्यात अडचण येत असल्यास, तोंडावाटे घेतले जाणारे नेहमीचे पूरक औषध पुरेसे ठरेलच असे नाही.
दररोज किती जीवनसत्त्व बी१२ घेणे आवश्यक आहे?
दररोज आवश्यक असलेल्या जीवनसत्त्व बी१२चे प्रमाण वयानुसार आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार बदलते. खालील प्रमाणे अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित असून सर्वसाधारण माहितीसाठी उपयुक्त आहेत.
|
वय किंवा आयुष्यातील टप्पा |
दररोज आवश्यक प्रमाण |
|
१९ वर्षे आणि त्यापुढील प्रौढ व्यक्ती |
२.४ मायक्रोग्रॅम |
|
गर्भवती महिला |
२.६ मायक्रोग्रॅम |
|
स्तनपान करणाऱ्या महिला |
२.८ मायक्रोग्रॅम |
जीवनसत्त्व बी१२च्या पूरक औषधांचे दुष्परिणाम
जीवनसत्त्व बी१२ची पूरक औषधे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला सहसा चांगल्या प्रकारे मानवतात. मात्र, काही व्यक्तींना पुढील दुष्परिणाम जाणवू शकतात:
- मळमळ होणे किंवा पोट बिघडणे
- डोकेदुखी किंवा चक्कर येणे
- सौम्य जुलाब होणे किंवा पोट फुगणे
- त्वचेवर खाज येणे, लालसरपणा येणे किंवा पुरळ उठणे (क्वचित)
- संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना मुरुमांसारखे फोड येणे (क्वचित)
- क्वचित प्रसंगी अस्वस्थ वाटणे किंवा मन बेचैन होणे
जीवनसत्त्व बी१२ची कमतरता असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, विनाकारण अशक्तपणा येत असेल, हातापायांना मुंग्या येत असतील, स्मरणशक्तीशी संबंधित अडचणी येत असतील किंवा जीवनसत्त्व बी१२च्या कमतरतेची इतर लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीरातील जीवनसत्त्व बी१२चे प्रमाण तपासण्यासाठी डॉक्टर रक्ततपासणी करण्यास सांगू शकतात. गरजेनुसार इतर तपासण्यांचाही सल्ला दिला जाऊ शकतो.
पुढील त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या:
- हातापायांना सतत बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे.
- चालताना किंवा शरीराचा तोल सांभाळताना अडचण येणे.
- खूप अशक्तपणा जाणवणे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित त्रास वाढणे.
- धाप लागणे किंवा त्वचा नेहमीपेक्षा जास्त फिकट दिसणे यांसारखी रक्तक्षयाची लक्षणे दिसणे.
मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी जीवनसत्त्व बी१२चे महत्त्व अधिक जाणून घ्या.
निष्कर्ष
शरीरात जीवनसत्त्व बी१२ची कमतरता असल्याची लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका. कारण या कमतरतेचा कालांतराने तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
झीलॅब फार्मसीच्या परवडणाऱ्या किमतीतील आणि परिणामकारक जीवनसत्त्व बी१२च्या पूरक औषधांमुळे शरीरातील ऊर्जा टिकवण्यास, मज्जातंतूंचे आरोग्य जपण्यास आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळू शकते.
तुमच्या गरजेनुसार योग्य जीवनसत्त्व बी१२चे पूरक औषध निवडणे आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे यामुळे चांगले परिणाम मिळण्यास मदत होऊ शकते.
वेळीच आरोग्य तपासणी करून घ्या, औषधे नियमितपणे घ्या आणि शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आवश्यक पोषक घटकांचा योग्य पुरवठा होईल याची काळजी घ्या. यामुळे निरोगी जीवनशैली टिकवण्यास मदत होईल.
Table of Contents
Frequently Asked Questions (FAQs)
Ans.माय१२ ओडी, माय१२ ५०० आणि झेकोबॅक्स फोर्ट या भारतातील प्रौढांसाठी उपयुक्त जीवनसत्त्व बी१२च्या काही उत्तम गोळ्या आहेत. यांपैकी योग्य गोळी निवडताना तिच्यातील सर्व घटक, शरीरातील जीवनसत्त्व बी१२च्या कमतरतेचे प्रमाण आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणे आवश्यक आहे.
Ans.सामान्य लक्षणांमध्ये सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, त्वचा फिकट दिसणे, हातापायांना मुंग्या येणे, स्मरणशक्ती कमी होणे, जीभ दुखणे आणि गंभीर अवस्थेत शरीराचा तोल सांभाळताना अडचण येणे यांचा समावेश होतो.
Ans.होय, शाकाहारी आणि पूर्णपणे वनस्पतीजन्य आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व बी१२ची कमतरता होण्याचा धोका अधिक असू शकतो. कारण या जीवनसत्त्वाचे नैसर्गिक स्रोत प्रामुख्याने प्राणिजन्य पदार्थांमध्ये आढळतात. मात्र, जीवनसत्त्वे मिसळलेले अन्नपदार्थ किंवा पूरक औषधांमधून पुरेसे बी१२ मिळाल्यास ही कमतरता टाळता येऊ शकते.
Ans.जीवनसत्त्व बी१२च्या गोळ्या शरीरातील या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यास, लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यास, मज्जातंतूंचे आरोग्य चांगले राखण्यास आणि बी१२च्या कमतरतेमुळे जाणवणारा थकवा कमी करण्यास मदत करतात.
Ans.होय, शरीरात पुरेसे जीवनसत्त्व बी१२ असल्यास त्याच्या कमतरतेमुळे होणारा महाकाय पेशीय रक्तक्षय टाळण्यास मदत होते. मात्र, रक्तक्षयाची इतर कारणे असल्यास योग्य तपासणी आणि उपचार करणे आवश्यक आहे.
Ans.मिथाइलकोबालामिन आणि सायनोकोबालामिन ही जीवनसत्त्व बी१२ची प्रचलित स्वरूपे आहेत. यांपैकी कोणतेही एक सर्वांसाठी सर्वोत्तम असे नाही. योग्य प्रकाराची निवड शरीरातील कमतरता, जीवनसत्त्व शोषून घेण्याची क्षमता आणि उपचारांची गरज यांनुसार केली जाते.
Ans.जीवनसत्त्व बी१२ची पूरक औषधे शरीरातील बी१२ची गरज पूर्ण करण्यास मदत करतात, तर बी समूहातील पूरक औषधांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. तुमच्या पोषणाच्या गरजेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य पर्याय निवडा.
Ans.जीवनसत्त्व बी१२च्या गोळ्या योग्य प्रमाणात घेतल्यास त्या दररोज घेणे सामान्यतः सुरक्षित असते. किती मात्रा घ्यावी हे तुमचा आहार, शरीरातील बी१२च्या कमतरतेचे प्रमाण आणि डॉक्टरांचा सल्ला यांवर अवलंबून असते.
Ans.भारतात जीवनसत्त्व बी१२ची अनेक पूरक औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. मात्र, शरीरात कमतरतेची लक्षणे जाणवत असल्यास किंवा जास्त मात्रेत उपचारांची गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ans.काही व्यक्तींना काही आठवड्यांतच सुधारणा जाणवू लागते, तर पूर्णपणे बरे होण्यासाठी काही महिने लागू शकतात. हे शरीरातील कमतरतेचे प्रमाण, उपचारांचा परिणाम आणि मज्जातंतूंना इजा झाली आहे की नाही, यांवर अवलंबून असते.
MY12 500 हे जीवनसत्त्व B12 चे नैसर्गिक आणि शुद्ध पूरक आहे. हे पेशींची वाढ, रक्तनिर्मिती यांसारख्या काही महत्त्वाच्या शारीरिक क्रिया नियंत्रित करण्यासाठी घेतले जाते.
10 Tablets In 1 Strip
My 12 OD गोळी (व्हिटॅमिन B12 गोळी) पर्निशियस अॅनिमिया असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता उपचारण्यासाठी वापरली जाते. प्रभावी उपचारासाठी My 12 OD गोळी झीलॅब फार्मसीमधून खरेदी करा.
10 Tablets In 1 Strip
झेकोबॅक्स Z मल्टिव्हिटामिन कॅप्सूल (A ते Z मल्टिव्हिटामिन कॅप्सूल) ऊर्जा सप्लिमेंट म्हणून वापरली जाते. उत्तम आरोग्यासाठी झीलॅब फार्मसीमधून A ते Z मल्टिव्हिटामिन खरेदी करा.
15 Capsules In 1 Strip
Zecobax FORTE रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी, ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी वापरले जाते. वाढीव ताजेतवानेपणासाठी Zecobax FORTE Zeelab Pharmacy मधून खरेदी करा.
10 Tablets In 1 Strip
Zecobax CZS मध्ये कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे आहेत. प्रभावी परिणामांसाठी Zecobax CZS Zeelab Pharmacy मधून खरेदी करा.
14 Tablets In 1 Strip
My 12 D3 गोळीत मेकोबालामिन 1500 mcg आणि जीवनसत्त्व D3 1000 IU असते, जे मज्जातंतूंच्या वेदना कमी करण्यासाठी आणि पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. My 12 D3 गोळी आता झीलॅब फार्मसीमधून खरेदी करा.
15 Tablets In 1 Strip
Recent Blogs
References
Disclaimer : Zeelab Pharmacy provides health information for knowledge only. Do not self-medicate. Always consult a qualified doctor before starting, stopping, or changing any medicine or treatment.
Related Products
Need Medicines Quick?
Share location to check quick delivery serviceability.
Change Location
Location Access Needed
Your location appears to be blocked or disabled.
Please enable the location from your browser or
device settings.
₹ 0
0
Items added
Quick Links
Categories
Our Policies
2026 Copyright By © Zeelab Pharmacy Private Limited. All Rights Reserved
Our Payment Partners
Added!
|
|




