facebook


अर्धशिशीसाठी भारतातील सर्वोत्तम औषधे: वेदना कमी करणाऱ्या औषधांची नावे आणि उपचारांचे पर्याय

 Best Medicine For Migraine  Best Medicine For Migraine

तुम्हाला अर्धशिशीचा त्रास होत असेल किंवा यापूर्वी कधी अर्धशिशीचा झटका आला असेल, तर ही वेदना सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते, हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. अर्धशिशी हा मज्जासंस्थेशी संबंधित एक सामान्य विकार आहे. यामुळे डोक्याच्या एका बाजूला मध्यम ते तीव्र वेदना होऊ शकतात. जगभरातील १०० कोटींहून अधिक लोक या त्रासाने प्रभावित आहेत.

अर्धशिशीवरील योग्य औषधाची निवड वेदनांची तीव्रता, त्रास किती वेळा होतो, रुग्णाचे वय, इतर लक्षणे आणि सध्या सुरू असलेली औषधे यांनुसार केली जाते. काही लोकांना औषधांच्या दुकानात सहज मिळणाऱ्या वेदनाशामक औषधांनी आराम मिळू शकतो, तर काहींना अर्धशिशीसाठी विशेष औषधांची गरज भासू शकते.

अर्धशिशीच्या वेदना कमी करण्यासाठी आयबुप्रोफेन, नॅप्रोक्सेन आणि सुमाट्रिप्टान ही सामान्यतः वापरली जाणारी औषधे आहेत.

या लेखात आपण भारतात अर्धशिशीसाठी वापरली जाणारी प्रमुख औषधे, ती कशा प्रकारे कार्य करतात, त्यांचे फायदे, औषधांची नावे, अर्धशिशीच्या डोकेदुखीसाठी वापरली जाणारी सामान्य औषधे आणि उपचारांचे विविध पर्याय यांविषयी जाणून घेणार आहोत.

अर्धशिशी म्हणजे काय?

अर्धशिशी म्हणजे केवळ डोकेदुखी नव्हे. हा मज्जासंस्थेशी संबंधित एक सामान्य विकार आहे. यामुळे डोक्याच्या एका बाजूला मध्यम ते तीव्र वेदना होऊ शकतात. यासोबत मळमळणे, उलटी होणे तसेच प्रकाश आणि मोठ्या आवाजाचा अधिक त्रास जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

अर्धशिशीची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • मध्यम ते तीव्र डोकेदुखी
  • मळमळणे आणि उलटी होणे
  • प्रकाश आणि मोठ्या आवाजाचा त्रास होणे
  • चक्कर येणे किंवा भोवळ येणे
  • थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

अर्धशिशी कशामुळे होते?

अनेक कारणांच्या एकत्रित परिणामामुळे अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो. यामध्ये आनुवंशिकता, मज्जासंस्थेशी संबंधित बदल आणि बाह्य घटकांचा समावेश होतो. काही विशिष्ट गोष्टींमुळे अर्धशिशीचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते.

अर्धशिशी होण्याची सामान्य कारणे आणि झटका येण्यास कारणीभूत ठरणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत:

  • ताणतणाव आणि चिंता
  • झोपेच्या वेळेत बदल होणे किंवा पुरेशी झोप न मिळणे
  • वेळेवर जेवण न करणे किंवा जेवण टाळणे
  • पुरेसे पाणी न पिणे
  • अतिप्रमाणात कॉफी पिणे
  • शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत चढ-उतार होणे
  • तीव्र प्रकाश किंवा मोठ्या आवाजाच्या संपर्कात येणे
  • काही विशिष्ट पदार्थ खाणे किंवा आहारातील ठरावीक घटक
  • मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवणे

अर्धशिशीच्या डोकेदुखीपासून आराम देणारी सामान्य औषधे

लक्षणे आणि वेदनांची तीव्रता लक्षात घेऊन अर्धशिशीची डोकेदुखी आणि वेदना कमी करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो.

भारतात अर्धशिशीसाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या काही औषधांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

औषधाचे नाव

सामान्य उपयोग

आयबुप्रोफेन

सौम्य ते मध्यम अर्धशिशीच्या वेदना कमी करते

नॅप्रोक्सेन

अर्धशिशीशी संबंधित वेदना आणि सूज कमी करते

सुमाट्रिप्टान

मध्यम ते तीव्र अर्धशिशीच्या झटक्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते

रिझाट्रिप्टान

अर्धशिशीच्या वेदना आणि त्यासोबतची इतर लक्षणे कमी करते

रिमेजेपंट

प्रौढांमध्ये अर्धशिशीचे झटके कमी करण्यासाठी आणि भविष्यातील झटके टाळण्यासाठी वापरले जाते

भारतातील अर्धशिशीसाठी सर्वोत्तम गोळ्यांची नावे

अर्धशिशीसाठी सर्वोत्तम गोळ्या त्या असतात, ज्या डोक्याच्या एका बाजूला होणाऱ्या वेदना आणि डोकेदुखीचा त्रास कमी करण्यास मदत करतात आणि ज्यांचे दुष्परिणाम कमीत कमी असतात. 

झीलॅब फार्मसीमध्ये अर्धशिशीवरील विविध औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. अर्धशिशीवरील औषधे नेहमी त्यांच्या माहितीपत्रकातील सूचनांनुसार किंवा आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

आयबुप्रोल ४०० गोळी

आयबुप्रोल ४०० ही अर्धशिशीच्या वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी आयबुप्रोफेन युक्त गोळी आहे. यातील मुख्य औषधी घटक वेदना आणि सूज कमी करणाऱ्या औषधांच्या एका गटातील असल्यामुळे वेदना आणि सूज निर्माण करणाऱ्या रसायनांची निर्मिती कमी करण्यास मदत करतो.

  • घटक: आयबुप्रोफेन ४०० मिग्रॅ
  • फायदे: अर्धशिशीमुळे होणारी डोकेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते.

नॅप्रोझी डीएम २५० गोळी

नॅप्रोझी डीएम २५० या गोळीत नॅप्रोक्सेन आणि डॉम्पेरिडोन या दोन औषधी घटकांचे मिश्रण आहे. अर्धशिशीच्या वेदनांसोबत अनेकदा मळमळणे आणि उलटी होण्याचा त्रासही जाणवतो. ही गोळी वेदना कमी करण्यासोबतच या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासही मदत करू शकते.

  • घटक: नॅप्रोक्सेन सोडियम २५० मिग्रॅ + डॉम्पेरिडोन १० मिग्रॅ
  • फायदे: अर्धशिशीच्या वेदनांसोबत होणारी मळमळ आणि उलटी कमी करण्यास मदत करते.

नॅप्रोझी २५० वेदनाशामक गोळी

नॅप्रोझी २५० ही अर्धशिशीच्या वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी गोळी आहे. यात २५० मिग्रॅ नॅप्रोक्सेन असते. हा घटक वेदना आणि सूज निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रोस्टाग्लँडिन्स या पदार्थांची निर्मिती रोखण्यास मदत करतो.

  • घटक: नॅप्रोक्सेन २५० मिग्रॅ
  • फायदे: अर्धशिशीमुळे होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते.

अर्धशिशीवरील औषधे कशा प्रकारे कार्य करतात?

अर्धशिशीवरील औषधे त्यांच्या प्रकारानुसार आणि उपचारांच्या उद्देशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात. काही औषधे अर्धशिशीचा झटका आल्यावर वेदना कमी करण्यास मदत करतात, तर काही औषधे भविष्यात अर्धशिशीचे झटके येण्याची शक्यता कमी करतात.

  • वेदना आणि सूज कमी करणारी औषधे: आयबुप्रोफेन आणि नॅप्रोक्सेन ही औषधे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
  • ट्रिप्टान गटातील औषधे: सुमाट्रिप्टान आणि रिझाट्रिप्टान ही औषधे अर्धशिशीशी संबंधित मज्जासंस्थेतील प्रक्रियांवर परिणाम करून झटक्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
  • प्रतिबंधात्मक औषधे: भविष्यात अर्धशिशीचे झटके किती वेळा येतात आणि त्यांची तीव्रता किती असते, हे कमी करण्यासाठी ही औषधे नियमितपणे घेतली जातात.

अर्धशिशीवरील औषधांचे दुष्परिणाम

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर औषधांचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. अर्धशिशीवरील औषधांमुळे कोणते दुष्परिणाम जाणवतील, हे औषधाचा प्रकार, त्याचे प्रमाण आणि व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. 

औषधांमुळे जाणवणारे सामान्य दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

  • मळमळणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे
  • चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे
  • डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवणे
  • छातीत जळजळ होणे किंवा अपचन होणे
  • तोंड कोरडे पडणे
  • मुंग्या येणे किंवा शरीरात विचित्र संवेदना जाणवणे
  • झोप येणे

अर्धशिशीपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपाय

अर्धशिशीवरील औषधे हा उपचारांचा एक भाग आहे. औषधोपचारांसोबत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास आणि भविष्यात अर्धशिशीचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते.

पुढील उपाय तुम्हाला उपयोगी ठरू शकतात:

  • अर्धशिशीचा झटका आल्यावर अंधाऱ्या आणि शांत खोलीत विश्रांती घ्या.
  • दिवसभर पुरेसे पाणी प्या.
  • वेळेवर जेवण करा आणि जेवण टाळणे शक्यतो टाळा.
  • झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा.
  • चहा, कॉफी यांसारख्या कॅफीनयुक्त पेयांचे अतिसेवन टाळा.
  • शरीराला झेपेल इतका नियमित व्यायाम करा.
  • मन शांत ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी विश्रांतीचे उपाय करा.
  • तुम्हाला अर्धशिशीचा झटका येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्या टाळा.

अर्धशिशीचा त्रास कमी करण्यासाठी आणि शरीराचे एकूण आरोग्य चांगले राखण्यासाठी अर्धशिशीपासून आराम मिळवण्यास मदत करणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल अधिक जाणून घ्या. यामुळे अर्धशिशीचा झटका येण्यास कारणीभूत ठरणारे आहारातील घटक ओळखण्यास मदत होऊ शकते.

अर्धशिशीचे झटके कसे टाळावेत?

अर्धशिशीचा प्रत्येक झटका टाळण्याचा एकच खात्रीशीर उपाय नाही. मात्र, झटका येण्यास कारणीभूत ठरणारे घटक ओळखणे आणि आरोग्यदायी दिनचर्या पाळणे यामुळे झटके येण्याचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते.

यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:

  • अर्धशिशीचा त्रास आणि त्याची लक्षणे यांची नोंद ठेवा.
  • झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा.
  • वारंवार जेवण टाळू नका.
  • शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
  • ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्हाला त्रास वाढवणारे घटक टाळा.
  • अर्धशिशीचे झटके रोखण्यासाठीची औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.

अर्धशिशीचा त्रास असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?

तुम्हाला वारंवार अर्धशिशीचे झटके येत असतील, त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होत असेल किंवा औषधांच्या दुकानात सहज मिळणाऱ्या औषधांनी पुरेसा आराम मिळत नसेल, तर योग्य तपासणी आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या:

  • अचानक सुरू झालेली आणि अत्यंत तीव्र डोकेदुखी.
  • डोक्याला दुखापत झाल्यानंतर सुरू झालेली डोकेदुखी.
  • शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे किंवा बधिरपणा येणे.
  • बोलण्यात अडचण येणे, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा दृष्टी जाणे.
  • झटके येणे किंवा तीव्र डोकेदुखीसोबत खूप ताप येणे.
  • नेहमीच्या अर्धशिशीच्या त्रासापेक्षा लक्षणे लक्षणीयरीत्या वेगळी असणे.

निष्कर्ष

भारतात अर्धशिशीसाठी योग्य औषधाची निवड झटक्यांची तीव्रता, ते किती वेळा येतात, त्यासोबत जाणवणारी लक्षणे, पूर्वीचा वैद्यकीय इतिहास आणि व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार केली जाते. 

आयबुप्रोफेन आणि नॅप्रोक्सेन यांसारखी वेदना व सूज कमी करणारी औषधे सौम्य ते मध्यम अर्धशिशीच्या वेदनांसाठी वापरली जाऊ शकतात. मध्यम ते तीव्र अर्धशिशीच्या झटक्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर सुमाट्रिप्टानसारखी औषधे देऊ शकतात.

जीवनशैलीत योग्य बदल करणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित झोप घेणे आणि अर्धशिशीचा झटका येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वैयक्तिक घटकांपासून दूर राहणे यामुळेही झटके नियंत्रणात ठेवण्यास आणि ते टाळण्यास मदत होऊ शकते. 

अर्धशिशीवरील औषधे आणि गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घ्या. अर्धशिशीचे झटके अधिक वारंवार येत असतील, वेदना तीव्र होत असतील किंवा नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Frequently Asked Questions (FAQs)

Q1. अर्धशिशीच्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणती औषधे सर्वोत्तम आहेत?

Ans.अर्धशिशीपासून आराम मिळवण्यासाठी आयबुप्रोफेन, नॅप्रोक्सेन आणि सुमाट्रिप्टान ही औषधे सामान्यतः वापरली जातात. योग्य औषधाची निवड झटक्याची तीव्रता, लक्षणे, पूर्वीचा वैद्यकीय इतिहास आणि औषधांचा व्यक्तीच्या शरीरावर होणारा परिणाम यांनुसार केली जाते.

Q2. अर्धशिशी आणि सामान्य डोकेदुखी यांमध्ये काय फरक आहे?

Ans.अर्धशिशीमध्ये सामान्यतः डोक्यात ठणकणाऱ्या मध्यम ते तीव्र वेदना होतात. यासोबत मळमळणे तसेच प्रकाश आणि मोठ्या आवाजाचा त्रास जाणवू शकतो. अनेक प्रकारच्या सामान्य डोकेदुखींमध्ये अशी लक्षणे सहसा आढळत नाहीत.

Q3. अर्धशिशीचा त्रास किती वेळ टिकतो?

Ans.योग्य उपचार न मिळाल्यास अर्धशिशीचा एक झटका ४ ते ७२ तास टिकू शकतो. मात्र, हा कालावधी प्रत्येक व्यक्तीनुसार आणि प्रत्येक झटक्यानुसार वेगवेगळा असू शकतो.

Q4. अर्धशिशीवरील औषधांचा परिणाम होण्यासाठी किती वेळ लागतो?

Ans.औषधाचा प्रकार, मात्रा, त्याचे स्वरूप आणि लक्षणांची तीव्रता यांनुसार अर्धशिशीवरील औषधांचा परिणाम सुरू होण्यासाठी साधारणपणे ३० ते ६० मिनिटे लागू शकतात.

Q5. अर्धशिशीचा झटका आल्यास काय करावे?

Ans.शांत आणि अंधाऱ्या खोलीत विश्रांती घ्या, पुरेसे पाणी प्या, त्रास वाढवणाऱ्या गोष्टी टाळा आणि डॉक्टरांनी सांगितलेले किंवा योग्य सल्ल्यानुसार वापरायचे औषध लवकर घ्या.

Q6. ताणतणावामुळे अर्धशिशीचा झटका येऊ शकतो का?

Ans.होय, काही व्यक्तींमध्ये ताणतणावामुळे अर्धशिशीचा झटका येऊ शकतो. अपुरी झोप, चिंता आणि दैनंदिन दिनचर्येतील बदल यांमुळेही अर्धशिशीचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते.

Q7. पॅरासिटामॉलमुळे अर्धशिशीच्या वेदना कमी होतात का?

Ans.होय, काही व्यक्तींमध्ये पॅरासिटामॉलमुळे अर्धशिशीच्या सौम्य वेदना कमी होऊ शकतात. झटका सुरू झाल्यानंतर लवकर आणि योग्य सूचनेनुसार हे औषध घेतल्यास आराम मिळू शकतो.

Q8. अर्धशिशीच्या वेदना कमी करणाऱ्या गोळ्या कोणी घेणे टाळावे?

Ans.पोट, मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या, रक्तदाबाचा त्रास असलेल्या, गर्भवती असलेल्या किंवा औषधांची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी अर्धशिशीवरील गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Q9. अर्धशिशीच्या डोकेदुखीसाठी इंजेक्शन कधी दिले जाते?

Ans.अर्धशिशीचा झटका तीव्र किंवा दीर्घकाळ टिकणारा असल्यास आणि तोंडावाटे घेतलेल्या औषधांचा पुरेसा परिणाम होत नसल्यास, ती औषधे घेणे शक्य नसल्यास किंवा उलट्यांमुळे औषध घेण्यात अडचण येत असल्यास इंजेक्शनचा वापर केला जाऊ शकतो.

Q10. अर्धशिशीच्या वेदना कमी करणाऱ्या गोळ्या दररोज घेता येतात का?

Ans.अर्धशिशीचा झटका आल्यावर वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी बहुतेक औषधे दररोज घेऊ नयेत. त्यांचा वारंवार वापर केल्यास औषधांच्या अतिवापरामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशा वेळी झटके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारांची गरज भासू शकते.

Q11. औषधांनी अर्धशिशीचा त्रास कायमचा बरा होतो का?

Ans.औषधांनी अर्धशिशीचा त्रास कायमचा बरा होईलच असे नाही. मात्र, योग्य पद्धतीने केलेल्या उपचारांमुळे वेदना कमी होऊ शकतात, झटके येण्याचे प्रमाण घटू शकते आणि दैनंदिन जीवनावरील त्यांचा परिणाम कमी होऊ शकतो.

Q12. अर्धशिशीचा त्रास असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?

Ans.अर्धशिशीचे झटके वारंवार येत असतील, वेदना तीव्र होत असतील, त्रास वाढत असेल किंवा लक्षणे नेहमीपेक्षा वेगळी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, गोंधळल्यासारखे वाटणे, झटके येणे किंवा दृष्टी जाणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

Recent Blogs


Disclaimer : Zeelab Pharmacy provides health information for knowledge only. Do not self-medicate. Always consult a qualified doctor before starting, stopping, or changing any medicine or treatment.


medicine cart

₹ 0

0

Items added


2026 Copyright By © Zeelab Pharmacy Private Limited. All Rights Reserved

Our Payment Partners

card
correct iconAdded!