facebook


भारतात डोकेदुखीसाठी सर्वोत्तम औषधे: डोकेदुखीच्या औषधांची नावे | संपूर्ण मार्गदर्शक

List Of Medicines For Headache In India List Of Medicines For Headache In India

आपल्याला कधी ना कधी डोकेदुखीचा त्रास होतोच. डोक्यात तीव्र दाब जाणवणे, डोके घट्ट आवळल्यासारखे वाटणे किंवा डोक्याच्या त्वचेपासून चेहरा आणि मानेपर्यंत वेदना पसरणे, अशा प्रकारे डोकेदुखी जाणवू शकते. प्रत्येक व्यक्तीमध्ये डोकेदुखीची तीव्रता आणि स्वरूप वेगवेगळे असू शकते.

ताणतणाव, अपुरी झोप आणि शरीरात पाण्याची कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. सौम्य डोकेदुखीवर काही सोपे घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. मात्र, डोकेदुखी तीव्र असल्यास औषधांची गरज भासू शकते.

भारतात पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन ही डोकेदुखीवरील सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे आहेत.

या लेखातून तुम्हाला डोकेदुखीची कारणे, तिचे वेगवेगळे प्रकार, सहज उपलब्ध असलेल्या डोकेदुखीच्या औषधांची नावे आणि आराम मिळवण्याचे इतर उपाय समजण्यास मदत होईल.

डोकेदुखी म्हणजे काय?

डोके, डोक्याची त्वचा किंवा मानेच्या भागात होणाऱ्या वेदना किंवा अस्वस्थतेला डोकेदुखी म्हणतात. हा त्रास सौम्य किंवा तीव्र असू शकतो. काही वेळा तो थोड्या वेळात कमी होतो, तर काही वेळा अनेक तास किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. डोकेदुखीचा प्रकार आणि तिची तीव्रता यानुसार वेदनांचे स्वरूपही बदलते.

डोकेदुखी स्वतंत्रपणे होऊ शकते किंवा शरीरातील इतर एखाद्या त्रासाचे लक्षण असू शकते. डोकेदुखीचे संभाव्य कारण समजून घेतल्यास योग्य उपचार निवडणे आणि औषधांची गरज कधी आहे हे ठरवणे सोपे जाते.

डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार कोणते?

डोकेदुखीचे अनेक प्रकार असतात. प्रत्येक प्रकारात वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे डोकेदुखीच्या प्रकारानुसार उपचार आणि औषधेही वेगवेगळी असू शकतात. 

डोकेदुखीचे काही सामान्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

डोकेदुखीचा प्रकार

सामान्य लक्षणे

ताणामुळे होणारी डोकेदुखी

डोक्याभोवती दाब जाणवणे किंवा डोके घट्ट आवळल्यासारखे वाटणे

अर्धशिशी

ठणकणारी डोकेदुखी, मळमळ होणे, प्रकाश किंवा आवाज सहन न होणे

समूह डोकेदुखी

विशेषतः एका डोळ्याच्या आजूबाजूला तीव्र वेदना होणे

सायनसमुळे होणारी डोकेदुखी

नाक बंद होणे किंवा सायनसचा त्रास यांसोबत डोके दुखणे

डोकेदुखीची सामान्य कारणे

डोकेदुखीवर योग्य औषध निवडण्यापूर्वी ती नेमकी कशामुळे होत आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

पुढील कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते:

  • ताणतणाव आणि चिंता
  • पुरेशी झोप न मिळणे
  • शरीरात पाण्याची कमतरता
  • उपवास करणे किंवा वेळेवर न जेवणे
  • चहा किंवा कॉफीमधील कॅफिन अचानक बंद केल्यामुळे होणारा त्रास
  • मोठ्या आवाजाच्या किंवा प्रखर प्रकाशाच्या संपर्कात येणे
  • हवामानातील बदल
  • आहाराच्या सवयी
  • शरीरातील इतर आरोग्यविषयक समस्या

डोकेदुखीचे संभाव्य कारण समजल्यास योग्य डोकेदुखीवरील औषध आणि इतर उपचारपद्धती निवडण्यास मदत होते.

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाणारी सामान्य औषधे 

डोकेदुखीवरील औषधाची निवड ही डोकेदुखीचे कारण आणि तिची तीव्रता यावर अवलंबून असते. 

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सामान्यपणे वापरली जाणारी काही औषधे पुढीलप्रमाणे आहेत:

औषधाचे नाव

औषधाचा प्रकार

कशासाठी वापरले जाते

पॅरासिटामॉल

वेदनाशामक औषध

सौम्य ते मध्यम डोकेदुखी आणि वेदना कमी करण्यासाठी

आयबुप्रोफेन

दाह कमी करणारे वेदनाशामक औषध

डोकेदुखी, अर्धशिशी, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी

नॅप्रोक्सेन

दाह कमी करणारे वेदनाशामक औषध

काही प्रकारच्या डोकेदुखी आणि अर्धशिशीच्या झटक्यांवर

डायक्लोफेनॅक

दाह कमी करणारे वेदनाशामक औषध

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी

ॲस्पिरिन

दाह कमी करणारे वेदनाशामक औषध

प्रौढांमधील काही प्रकारची डोकेदुखी आणि अर्धशिशीच्या झटक्यांवर

सुमाट्रिप्टन

अर्धशिशीवरील विशेष औषध

अर्धशिशीवरील डॉक्टरांच्या चिठ्ठीने मिळणारे औषध

सामान्य डोकेदुखी आणि अर्धशिशी हे वेगवेगळे त्रास आहेत. त्यामुळे अर्धशिशीचा त्रास असल्यास त्यासाठी योग्य औषधे वापरावीत. 

भारतातील डोकेदुखीवरील सर्वोत्तम गोळ्यांची यादी

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची नावे आणि त्यांमधील घटक यांची माहिती जाणून घ्या.

झीलॅब फार्मसीमध्ये उपलब्ध असलेले काही पर्याय पुढीलप्रमाणे आहेत: 

गोळीचे नाव

घटक आणि त्यांचे प्रमाण

पॅराझेक्स ५०० 

पॅरासिटामॉल ५०० मि.ग्रॅ.

आयबुप्रोल ४०० 

आयबुप्रोफेन ४०० मि.ग्रॅ.

नॅप्रोझी ५०० 

नॅप्रोक्सेन ५०० मि.ग्रॅ.

डायकॅमॉल १०० एसआर 

डायक्लोफेनॅक १०० मि.ग्रॅ.

पॅराझेक्स ५०० गोळी

पॅराझेक्स ५०० ही भारतात डोकेदुखीसाठी वापरली जाणारी एक सामान्य गोळी आहे. यामध्ये पॅरासिटामॉल हा घटक असतो. हा घटक शरीरातील वेदनांची जाणीव करून देणाऱ्या प्रक्रियेवर परिणाम करून सौम्य ते मध्यम डोकेदुखी कमी करण्यास मदत करतो.

  • घटक: पॅरासिटामॉल ५०० मि.ग्रॅ.
  • फायदे: डोकेदुखी तसेच सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

आयबुप्रोल ४०० गोळी

आयबुप्रोल ४०० मध्ये आयबुप्रोफेन हा घटक असतो. डोकेदुखी कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांपैकी ही एक आहे. यातील औषधी घटक दाह कमी करणाऱ्या औषधांच्या गटातील असून वेदना आणि सूज निर्माण करणाऱ्या शरीरातील घटकांचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.

  • घटक: आयबुप्रोफेन ४०० मि.ग्रॅ.
  • फायदे: डोकेदुखी आणि सूजेमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.

नॅप्रोझी ५०० गोळी

नॅप्रोझी ५०० शरीरातील वेदनांचे संकेत कमी करण्यास मदत करते. या गोळीमध्ये ५०० मि.ग्रॅ. नॅप्रोक्सेन असते. ताणामुळे होणारी डोकेदुखी आणि अर्धशिशीच्या वेदनांपासून काही काळ आराम मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. 

  • घटक: नॅप्रोक्सेन ५०० मि.ग्रॅ.
  • फायदे: डोकेदुखी आणि दाहामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.

डायकॅमॉल १०० एसआर गोळी

डायकॅमॉल १०० एसआरमध्ये डायक्लोफेनॅक हा घटक असतो. हे दाह कमी करणारे वेदनाशामक औषध आहे. शरीरात वेदना आणि सूज निर्माण करणाऱ्या प्रोस्टाग्लँडिन्स या पदार्थांची निर्मिती रोखण्यास ते मदत करते. तीव्र डोकेदुखीच्या वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्याने या गोळीचा उपयोग केला जाऊ शकतो.

  • घटक: डायक्लोफेनॅक सोडियम १०० मि.ग्रॅ. (दीर्घकाळ परिणाम करणारे औषध)
  • फायदे: डोकेदुखीशी संबंधित वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते.

डोकेदुखीसाठी योग्य औषध कसे निवडावे?

डोकेदुखीवरील योग्य औषध निवडताना केवळ वेदनांची तीव्रता लक्षात घेणे पुरेसे नसते. इतर अनेक गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे. 

औषध निवडताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  • तुम्हाला कोणत्या प्रकारची डोकेदुखी होत आहे.
  • वेदना किती तीव्र आहेत आणि किती वेळा होतात.
  • वेदना होणाऱ्या व्यक्तीचे वय.
  • मूत्रपिंड, यकृत, पोट किंवा हृदयाशी संबंधित काही आजार आहेत का.
  • सध्या घेत असलेल्या इतर औषधांसोबत या औषधांचा काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे का.

डोकेदुखीच्या औषधांचे दुष्परिणाम

डोकेदुखीवरील औषधे सांगितलेल्या सूचनांनुसार घेतल्यास सामान्यपणे सुरक्षित असतात. 

मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर औषधांचा परिणाम वेगवेगळा होऊ शकतो. काही जणांना पुढील दुष्परिणाम जाणवू शकतात:

  • मळमळ होणे किंवा उलट्या होणे
  • अन्न पचण्यास त्रास होणे किंवा पोट दुखणे
  • चक्कर येणे
  • त्वचेवर पुरळ येणे किंवा ॲलर्जी होणे
  • काही दाह कमी करणाऱ्या वेदनाशामक औषधांमुळे पोटात व्रण होणे किंवा पोटातून रक्तस्राव होणे
  • पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्यास यकृताला इजा होऊ शकते

डोकेदुखी होऊ नये यासाठी काय करावे?

रोजच्या जीवनात काही सोप्या सवयी अंगीकारल्यास डोकेदुखी होण्याची शक्यता कमी करता येते आणि एकूण आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. उदाहरणार्थ:

  • दिवसभर पुरेसे पाणी प्या.
  • नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा. दररोज किमान ७ तास झोप घ्या.
  • ताणतणाव कमी करण्यासाठी मन शांत ठेवणारे उपाय करा.
  • दररोज व्यायाम करून शरीर हालते-चालते ठेवा.
  • ज्या गोष्टींमुळे डोकेदुखी होते त्या ओळखा आणि शक्यतो त्यापासून दूर राहा.

डोकेदुखीची औषधे सुरक्षितपणे कशी घ्यावीत?

डोकेदुखीची औषधे चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकतो आणि अनावश्यक दुष्परिणामही जाणवू शकतात. हे टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी.

  • औषधाच्या आवरणावरील सूचनांनुसार किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच औषध घ्या.
  • डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाच्या प्रमाणापेक्षा जास्त घेऊ नका.
  • सर्दी, पडसे किंवा वेदनांसाठी घेत असलेल्या एकत्रित औषधांमध्ये पॅरासिटामॉल आहे की नाही, हे नक्की तपासा.
  • एकाच वेळी दाह कमी करणारी दोन किंवा अधिक वेदनाशामक औषधे घेऊ नका.
  • वारंवार होणाऱ्या डोकेदुखीसाठी स्वतःहून अनेक औषधे घेऊ नका.
  • यकृत, मूत्रपिंड, पोट, हृदय किंवा इतर कोणताही आजार असल्यास डॉक्टरांना त्याबद्दल सांगा.
  • गर्भवती असल्यास डोकेदुखीचे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा औषधतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय १६ वर्षांखालील मुलांना ॲस्पिरिन देऊ नका.

डोकेदुखी झाल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?

डोकेदुखी तीव्र असल्यास, औषध घेऊनही कमी होत नसल्यास, वारंवार होत असल्यास किंवा दिवसेंदिवस वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोकेदुखीसोबत पुढील धोक्याची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या:

  • अचानक खूप तीव्र डोकेदुखी सुरू होणे
  • डोक्याला मार लागल्यानंतर डोके दुखणे
  • गोंधळल्यासारखे वाटणे, अशक्तपणा येणे किंवा शरीराचा तोल जाणे
  • दृष्टी कमी होणे किंवा दिसणे बंद होणे
  • खूप ताप येणे आणि मान ताठ होणे
  • वारंवार उलट्या होणे

हेही वाचा: मानेच्या दुखण्यावरील सर्वोत्तम औषध

निष्कर्ष

डोकेदुखी हा कधी साधा त्रास असू शकतो, तर काही वेळा तिचे कारण आणि तीव्रता यानुसार ती गंभीर आरोग्यसमस्येचे लक्षणही असू शकते. झीलॅब फार्मसी येथे वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार मिळणारी विविध औषधे उपलब्ध आहेत.

डोकेदुखीचा प्रकार, लक्षणे, आधीपासून असलेले आजार आणि सध्या सुरू असलेली इतर औषधे यांचा विचार करूनच योग्य औषध निवडावे. 

वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर टाळा. कारण त्यामुळे औषधांच्या अतिवापरामुळे पुन्हा डोकेदुखी होण्याचा त्रास उद्भवू शकतो. योग्य औषधे, जीवनशैलीतील चांगले बदल आणि नैसर्गिक उपाय यांच्या मदतीने डोकेदुखी नियंत्रणात ठेवता येते आणि एकूण आरोग्यही चांगले राखता येते.

Frequently Asked Questions (FAQs)

Q1. भारतात डोकेदुखीसाठी सर्वोत्तम औषध कोणते?

Ans.पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन ही भारतात सौम्य ते मध्यम डोकेदुखीसाठी सामान्यपणे वापरली जाणारी औषधे आहेत. योग्य औषधाची निवड डोकेदुखीचे कारण, तिची तीव्रता आणि व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते.

Q2. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी डोकेदुखीची औषधे सुरक्षित असतात का?

Ans.डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी डोकेदुखीची औषधे आवरणावरील सूचनांनुसार किंवा आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास सुरक्षित असू शकतात. सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त औषध घेऊ नका किंवा त्यांचा वारंवार वापर करू नका.

Q3. तीव्र डोकेदुखीसाठी कोणते औषध घ्यावे?

Ans.तीव्र डोकेदुखीचे कारण काय आहे यानुसार उपचार वेगवेगळे असू शकतात. तपासणी न करता वारंवार वेदनाशामक औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Q4. नैसर्गिक उपायांनी डोकेदुखी कशी कमी करावी?

Ans.पाणी प्या, शांत खोलीत विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या, जेवण चुकले असल्यास खा, मन शांत ठेवणारे उपाय करा आणि भ्रमणध्वनी व इतर पडद्यांकडे पाहण्याचा वेळ कमी करा.

Q5. डोक्याच्या एका बाजूला होणाऱ्या दुखण्यावर उपचार कसे करावेत?

Ans.डोक्याच्या एका बाजूला होणारी वेदना अर्धशिशी किंवा इतर आरोग्यसमस्यांमुळे होऊ शकते. विश्रांती, पुरेसे पाणी पिणे आणि योग्य औषधे यांमुळे आराम मिळू शकतो. मात्र, हा त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Q6. पॅरासिटामॉलने अर्धशिशीचा त्रास कमी होऊ शकतो का?

Ans.होय, काही व्यक्तींमध्ये अर्धशिशीचा सौम्य ते मध्यम स्वरूपाचा त्रास कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल मदत करू शकते. विशेषतः अर्धशिशीचा झटका सुरू झाल्यावर लवकर घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

Q7. मी रोज डोकेदुखीचे औषध घेऊ शकतो का?

Ans.डोकेदुखीची औषधे रोज घेण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर केल्याने औषधांच्या अतिवापरामुळे होणारी डोकेदुखी आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

Q8. डोकेदुखीच्या गोळ्यांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात का?

Ans.होय. डोकेदुखीच्या औषधांमुळे मळमळ, उलटी, अपचन, पोटदुखी, चक्कर येणे किंवा ॲलर्जी यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. काही दाहशामक औषधांमुळे पोटात अल्सर किंवा रक्तस्राव होण्याचाही धोका असतो.

Q9. गर्भधारणेदरम्यान डोकेदुखीची औषधे घेणे सुरक्षित आहे का?

Ans.गर्भधारणेदरम्यान डोकेदुखीची काही औषधे घेणे योग्य नसू शकते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांसह कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Q10. औषध घेतल्यानंतरही डोकेदुखी कमी होत नसेल तर काय करावे?

Ans.योग्य औषध घेतल्यानंतरही डोकेदुखी कमी होत नसेल, तर वारंवार औषधाचे अतिरिक्त डोस घेणे टाळा आणि डोकेदुखीचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Q11. डोकेदुखी होऊ नये यासाठी काय करावे?

Ans.पुरेसे पाणी प्या, वेळेवर जेवण करा, पुरेशी झोप घ्या, ताणतणाव कमी ठेवा, डोकेदुखी वाढवणाऱ्या गोष्टी टाळा आणि रोजचे दैनंदिन वेळापत्रक नियमित ठेवा.

Recent Blogs


Disclaimer : Zeelab Pharmacy provides health information for knowledge only. Do not self-medicate. Always consult a qualified doctor before starting, stopping, or changing any medicine or treatment.


medicine cart

₹ 0

0

Items added


2026 Copyright By © Zeelab Pharmacy Private Limited. All Rights Reserved

Our Payment Partners

card
correct iconAdded!